मुंबई: भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करत शरद पवार यांना टोमना मारला.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला. यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागले आहेत. शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदुबाबा आहेत. उद्धव ठाकरेंना जादुटोणा करुन ठाकरेंना जाळ्यात ओढलं. तसेच, या पक्षातील भोंदुबाबाच्या ताब्यात कोणं आलं तर तो सुटत नाही अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर केली.
दरम्यान, यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदी उपस्थित हाेते