Latest Marathi News

BREAKING NEWS

“देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा होतोय की, त्यांच्यावर खूप वर्कलोड आहे..” !

0 261

मुंबई: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सौम्य भाषेत टीका केली.

 

 

Jawale Jewellers

अंधारे म्हणाल्या, महिलांवर अत्याचार होत असेल तर याबाबत मी फक्त देवेंद्रजींनीच विचारते. गृह मंत्रालाय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा होतोय की, त्यांच्यावर खूप वर्कलोड आहे. मला देवेंद्रभाऊंची काळजी वाटते, शेवटी मी त्यांची बहीण आहे. सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद, गृहमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद एवढी खाती… माणसानं किती बिचाऱ्याने काम करायचं? त्यांनी थोडं वर्कलोड कमी केलं पाहीजे, त्यांना वर्कलोड झेपत नाही हे लक्षात येतंय. त्यांनी ते दुसऱ्याकडे सोपवलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.

Manganga

 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना माफिया म्हणत होते. आता त्यांच्यावर एफ आय आर कधी करणार? गृहमंत्री पद फडणवीस यांना झेपत नाही. जे मंत्री असभ्य बोलतात त्यांना ते गुळगुळीत बोलत आहे. भाजपकडे आल्यावर फाईल बंद होतात नकार दिला तर पुन्हा टाच आणली जात आहे हे थांबल पाहिजे, असेही वक्तव्य त्यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.