Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 678

मेष:-
करियर मध्ये प्रगती करता येईल. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. कोणत्याही वादापासून दूर राहावे. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
जोडीदाराची प्रगती होईल. प्रवासाचे योग येतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल.

Manganga

 

मिथुन:-
आरोग्यात सुधारणा होईल. नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल.

 

कर्क:-
मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. फाजील आत्मविश्वास टाळावा. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक.

 

सिंह:-
हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

 

कन्या:-
व्यसनांना वेळीच आवर घाला. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल.

 

तूळ:-
विवाहाची बोलणी पुढे सरकतील. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.

 

वृश्चिक:-
एखाद्या कामाला खीळ बसू शकते. जुनी उधारी वसूल होईल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल.

 

धनू:-
कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

 

मकर:-
आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा. प्रवासात घाई करून चालणार नाही. आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल.

 

कुंभ:-
हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. मानसिक संतुलन राखावे. चिकाटी सोडू नका. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा.

 

मीन:-
नव्या योजनेत गुंतवणूक कराल. घरात धार्मिक कार्य घडेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.