Latest Marathi News

BREAKING NEWS

केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमात केली ‘हि’ मोठी सुधारणा; जाणून घ्या…!

0 744

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आधार कार्डच्या नियमांत काही सुधारणा केल्या आहेत. केंद्र सरकारने याला इनरोलमेंट ऍन्ड अपडेट २०२२ असे नाव दिले आहे. सरकारने याच्या गाईडलाईन्स जाहीर करत आधार अपडेट करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यात तुम्हाला १० वर्षांत एकदा तरी आधार अपडेट करणे अनिवार्य आहे.

 

Jawale Jewellers

UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची सर्व माहिती दिलेली आहे. यात तुम्ही तु्मचे नाव, पत्ता आणि इतर माहिती अपडेट करू शकता. या सर्वांसाठी आधी काही मर्यादा होत्या. नाव, जन्मतारीख ही माहिती २ वेळाच बदलता येत होती.

Manganga

 

आधार कर्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी विविध शुल्क आकारले जाते. यात तुम्हाला ज्यामध्ये बदल करायचा आहे त्याचे निश्चित शुल्क भरुन आधार अपडेट होते. हे बदल करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या. यावर तुम्ही स्वत: देखील आधार अपडेट करू शकता.

 

दरम्यान, आधार अपडेट करणे सरकारने बंधनकारक केले आहे. आज आधार कार्ड सर्वच कामांमध्ये विचारले जाते. १० वर्षांचा काळ फार मोठा आहे. यात अनेक व्यक्ती आपले घर बदलतात. त्यामुळे आधारवरील पत्ता देखील बदलून घ्यायला हवा. यासह इतरही बदल झाले असल्यास तेही त्यात नमुद करावे. १० वर्षांनंतरही आधारकार्ड वरील पत्ता अपडेट नसेल तर तुम्हाला कोणतीही होम डिलीव्हरी मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.