Latest Marathi News

BREAKING NEWS

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध पुरावे कोर्टात सादर; मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक होणार?

0 142

मुंबई: मनी लाँड्रिंग केस प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस जमीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. मनी लाँड्रिंग केसच्या सुनावणीसाठी जॅकलिनने कोर्टात हजेरी लावली होती.

 

Jawale Jewellers

न्यायालयीन सुनावणी दरम्यान जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले की, “तिने काहीही केले नाही आणि ती तपासात सहकार्य करत आहे. मात्र या प्रकरणात ईडी तिला त्रास देत आहे. जॅकलिन स्वत: सरेंडर झाली असून न्यायालयाने तिला जामीनही मंजूर केला आहे.

Manganga

 

यावर ईडीने न्यायालयाला सांगितले की, जॅकलिनला पुराव्यांचा सामना करावा लागला तेव्हा तिने वस्तुस्थिती सांगितली. जॅकलिन ही परदेशी नागरिक असून तिचे कुटुंब श्रीलंकेत राहते. डिसेंबर 2021 मध्ये जॅकलीनने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

 

ईडीचे हे म्हणणे ऐकून न्यायालयाने प्रश्न केला की, जर तुमच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, तर तुम्ही तिला अटक का केली नाही? तुम्ही एलओसी (लूकआऊट सर्क्युलर) नोटीस दिली असतानाही तिली अटक का केली नाही?
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे. यावर न्यायालय उद्या निर्णय देणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.