Latest Marathi News

BREAKING NEWS

टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव!

0 307

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अॅडलेडच्या मैदानात आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला रंगला. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून भारताने ग्रुप स्टेजमध्ये आठ गुण प्राप्त करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. परंतु, आजच्या सामन्यात इंग्लंडने भारतावर दणदणीत विजय मिळवला.

 

Jawale Jewellers

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्डकपचा सेमीफायनलचा महामुकाबला अॅडलेडच्या मैदानात रंगला. भारतानं इंग्लंडला 169 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सलामी जोडीनं नाबाद अर्धशतकी खेळी करून भारतावर एकतर्फी विजय मिळवला. जॉस बटलरने 49 चेंडूत 80 तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुटल्या. दोघांच्या दमदार नाबाद खेळीमुळं भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने 16 षटकात 170 धावांची खेळी साकारून भारताचा पराभव केला.

Manganga

 

दरम्यान, इंग्लंडने 10 विकेट्स राखून सोळा षटकाचे 170 धावा करून भारताचा दारुण पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये टीम इंडियाबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.