Latest Marathi News

BREAKING NEWS

ब्रिटीश सरकारच्या ताब्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंब’ तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार: सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार!

0 208

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजेची ही तलवार होती. जगदंब तलवार सध्या ब्रिटीश सरकारच्या ताब्यात आहे. ती पुन्हा मिळावी यासाठी केंद्र सरकारमार्फत पाठपुरावा करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Manganga

 

 

दरम्यान, शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दृष्टीने विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. जर ब्रिटनने तलवार परत केली तर आपल्यासाठी तो आनंदोत्सव असेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.