Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अतिक्रमण अफजलखानाच्या….”: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0 207

मुंबई: स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफजलखानाची कबर, त्याजवळ झालेले अतिक्रमण व त्या माध्यमातून अफजलखानाचे उदात्तीकरण आम्ही कदापी खपवून घेणार नाही. म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी कारवाई करुन अतिक्रमण पाडले अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महाराजांना राज्याच्या स्वराज्यहितवादी सरकारकडून हा मानाचा मुजरा आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

 

Jawale Jewellers

10 नोव्हेंबर 1659 हा तो दिवस. आपण तो शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट खानाचा शिताफीने वध करून संपविले. अखेर शिवप्रताप दिनाचा मुहुर्त राज्य सरकारने पाहून आज ही कारवाई केली. राज्य सरकारला या कारवाईचे समाधान असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात यापुढे स्वराज्यद्रोही कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.