Latest Marathi News

BREAKING NEWS

आपल्याला अटक होणार हे माहित होत पण ‘त्या’ हिंमतीवर मी तुरुंगात गेलो: संजय राऊत!

0 185

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्बल 102 दिवसानंतर तुरुंगातून सुटले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण आपल्याला अटक होणार हे राऊत यांना आधीच माहीत होतं. त्याचं सुतोवाच त्यांनी वेळोवेळीही केलं आहे.

 

Jawale Jewellers

राऊत म्हणाले, “मी तुरुंगात गेलो. मला खात्री होती. उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या हिंमतीवर मी तुरुंगात गेलो, तसेच, आमच्या मूळ शिवसेनेसाठी दहावेळा तुरुंगात पाठवलं तरी मी तुरुंगात जायला तयार आहे, कधी तरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. ती तयारी नसेल तर पक्षाने 40 वर्षात जे दिलं. त्याच्याशी कृतघ्नता ठरेल. बाळासाहेबांपासून आदित्यपर्यंतचं नातं टिकलं पाहिजे. आम्ही कितीही सर्वोच्च स्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.