मुंबई: विक्रमवीर विराट कोहलीच्या रेकॉर्ड लिस्टमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराटने टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. चार हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
विराट आज मैदानात उतरला होता त्यावेळी त्याच्या 3958 धावा होत्या. त्याला चार हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी 42 धावांची आवश्यकता होती. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही.
दरम्यान, टी 20 क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू होता. त्यावेळी त्याने अवघ्या 87 सामन्यांमध्ये 81 डावांमध्ये 3000 धावा केल्या होत्या.