मुंबई: मालदीवची राजधानी माले येथे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ भारतीयांसह १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. ही आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते.
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास लागले. मालेमधील भारतीय उच्चायुक्तांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.