मुंबई: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काल जामीन मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांचे कौतुक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
हे सगळे एकत्र आल्यावर काय होईल. हे भाजपला दिसत नाहीये. मी मधल्या काळात भावूक झालो होतो त्याला तुरुंगात भेटायचं होतं, पण ते शक्य नाही झाले. हा खडतर काळ त्याच्यासाठी होता. तसाच आमच्यासाठीही होता’ असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्वप्रथम संजयच्या धाडसाचे कौतुक. न्यायालयाने मान्य केले की कारवाई चुकीची होती. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे. अंगावर जा म्हणलं की केंद्रीय न्यायमंत्री किरेन रिजिजू यांची काही वक्तव्ये आली, न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न होत आहे.