मुंबई: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसानंतर तुरूंगातून सुटका झाली. दरम्यान, आज संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. लवकरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय राऊत यांनी तब्बल तीन महिन्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोदी आणि शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील कौतुक केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत, असेही वक्तव्य केले.