Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्काद्यक: प्रियकरासोबत बायको पळून गेल्याने पतीने मुलांसह केली आत्महत्या

0 494

पंजाबमधी : फिरोजपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर पतीने कुटुंबातील तीन सदस्यांसह आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय जसविंदर सिंह उर्फ राजू कुटुंबासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.

त्यानंतर मंगळवारी जसविंदरने त्याचा 11 वर्षांचा पुतण्या आगम, 11 वर्षांची मुलगी गुरलीन कौर आणि त्याचा मोठा भाऊ हरप्रीत उर्फ बंटू यांच्यासह घलखुर्द कालव्यात कार टाकली. लोकांच्या मदतीने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली.
कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार आणि कारमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला.

Manganga

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार कालव्यात फेकणारा जसविंदरचा मुलगा दिव्यांश आणि भाऊ सोनू यांनी सांगितले की, त्यांचे वडील जसविंदर सिंह उर्फ राजू हे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. कारण, त्याची आई दुसऱ्या कुणासोबत पळून गेली होती.
पोलिसांनी कार आणि कारमधील लोकांचे मृतदेह शोधून त्यांना बाहेर काढले आहे. चारही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!