मुंबई: तब्बल 100 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची बुधुवारी (9 नोव्हेंबर) तुरुंगातून सुटका झाली. मात्र, या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे. या विरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यावर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
माहितीनुसार, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

दरम्यान, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.