मुंबई: केंद्र सरकारमार्फत रेशन कार्डवर एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात अनेकांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच रेशनकार्डवर मोफत मिळणारी सेवाही बंद होऊ शकते.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण १० लाख व्यक्ती बनावट शिधापत्रिकेद्वारे मोफत रेशन घेतात. त्यामुळे चिन्हांकीत केलेल्या सर्वच १० लाख व्यक्तींचे रेशनकार्ड रद्द होणार आहे. त्या १० लाख व्यक्तींची यादी देखील सरकारने तयार केली आहे.
रेशन कार्डवर मिळणारे अन्नधान्य तुमच्या उत्पान्नावर स्वस्त दरात किंवा मोफत दिले जाते. यात मोफत धान्य मिळवण्यासाठी तुम्ही आयकर भरता का? तसेच तुमच्याकडे १० एकरपेक्षा जास्त जमीन आहे का? हे निकष तपासले जातात. जे आयकर भरतात आणि ज्यांच्याकडे १० एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा व्यक्तींचे मोफत रेशन बंद केले जाणार आहे.
दरम्यान, गरजू व्यक्तींसाठी शिधापत्रिकेचे वाटप केले जाते. मात्र अनेक व्यक्ती बनावट शिधापत्रिकेच्या सहाय्याने मोफत रेशन मिळवतात. अशा बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार हे पाउल उचलत आहे.