मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टानं आज, बुधवारी अखेर जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर ईडीने संजय राऊतांच्या जामीनाच्या विरोधात ‘पीएमएलए’ कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीची संजय राऊतांना जामीनाच्या विरोधातील याचिका ‘पीएमएलए’ कोर्टाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत आजच तुरुंगातून बाहेर येणार आहे.
माहितीनुसार, ईडीने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला. त्यानंतर ईडी जामिनाच्या विरोधात ‘पीएमएलए’ कोर्टात गेली. मात्र, पीएमएलए’ कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.

दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने संजय राऊत तुरुंगातून बाहेर येणार आहे.