पुणे : सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर एका प्रसार वाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. तसेच, संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असे त्या म्हणाल्या.

तसेच यापुढे बोलताना सुषमा अंधारे यांना गहिवरुन आलं होतं. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.
दरम्यान, अखेर आता संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटात पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. संजय राऊत आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.