सांगोला : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (बुधवार) सांगोला येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मांजरी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यादरम्यान, मांजरी गावातील शेतकरी अतुल कुलकर्णी या शेतकऱ्याने वीज, पाणी, पीक विमा आणि शेती पिकांच्या नुकसान भरपाईसह विविध समस्या मांडल्या.
तसेच, त्यांनी भाजप रूपी रावणाने सत्तारूपी सीतेला पळवून नेले आहे. तिच्या भोवती सीबीआय आणि ईडी सारखे रक्षक बसवले आहे. तुम्ही हनुमान बनून परत सत्ता आणावी अशी हाक सांगोला येथील शेतक-याने युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना दिली.