Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेच्या या बड्या नेत्याला जामीन मंजूर

0 572

 

Jawale Jewellers

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.

Manganga

संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने लेखी उत्तर सादर केले होते. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी आज 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय दिला आहे.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.