Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी: शेळ्या मेंढ्याचा यात्रेत आवक वाढली

0 598

आटपाडी : पश्चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख ठेवणाऱ्या आटपाडी येथे भरणारा शेळी, मेंढी बाजार आता चांगलाच बहरू लागला आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पूर्वपदावर येणाऱ्या या बाजाराला बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे बाजारात गतीने उलाढाल वाढत आहे. शेळी, मेंढी आणि बकरीला कमालीचा दर मिळू लागल्याने शेतकरी, पशुपालक सुखावले आहेत.

Jawale Jewellers

या वर्षात यात्रा जत्रांवरील निर्बंध हटवले. गावागावांत यात्रा, जत्रा भरू लागल्याने आपोआप शेळी, मेंढी बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली. ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेत्याची संख्या वाढू लागली आहे.

Manganga

आता शेतकरी, पशुपालकांसह वाहन चालक-मालक, हातगाडे, वडापाव आणि चहाचे गाडे, जनावरांसाठी लागणारे दोर, कनडे, चाळ विक्रेते यांचाही आर्थिक गाडा सुरू झाला आहे. यामुळे हजारो हात कामाला लागले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.