Latest Marathi News

BREAKING NEWS

‘खोके सरकार’ या नेत्यांना नोटीसा

0 452

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निषेध करणारी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

Jawale Jewellers

“बांधावर जाऊन आम्ही पाहणी करत आहोत. दोनदा अतीवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पण सरकार म्हणून कुणी पुढे आलेलं नाही. कृषीमंत्रीही गायब आहेत.उद्योगमंत्री काय करतायत, हेही कुणाला माहिती नाही. कारण महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. उद्योग आणि कृषी ह दोन महत्त्वाचे घटक कोलमडताना दिसत आहेत”

Manganga

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिर्डीत पार पडलेल्या पक्षाच्या मंथन शिबिरात शिंदे सरकारवर ‘खोके घेतल्याचा आरोप’ असल्याचं म्हटले होते. तसेच, ‘अजूनही कुणी खोके घेतले नसल्याचा दावा केला नाही’, असंही त्या म्हणाल्या होत्या. आरोप चुकीचा असेल, तर नोटीस का पाठवली नाही, असा सवाल विरोधकांकडून शिंदे गटाला केला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.