Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक: पोटच्या मुलीची आईने गळा दाबून केली हत्या…

0 212

अकोला: महिला गेल्या महिन्यात आपल्या मुलीला घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरांनी मुलीला घेऊन अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. पण शवविच्छेदन करण्यात आलं असता मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचं स्पष्ट झाले. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Jawale Jewellers

आईनेच आपल्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेने मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झाले. न्यायालयात हजर करण्यात आलं असता महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.