Latest Marathi News

BREAKING NEWS

घरातल्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नववीतील विद्यार्थ्याने केले भयंकर कृत्य!

0 199

 

Jawale Jewellers

पाचोरा (जळगाव) : सोमवारी सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथील नववीत शिकणाऱ्या पंधरा वर्षे वयाच्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना घडली. ऋषिकेश संतोष आवारे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश या विद्यार्थ्याचे आई- वडील शेतमजुरी करतात. ऋषिकेश देखील शिक्षणासोबत शेळ्या चारणे व आई वडिलांसोबत शेतीकाम करून मदतीचा हात देत असे.
ऋषिकेश याच्या मोठ्या भावाला वडीलांनी मोबाईल घेऊन दिला. यानंतर ऋषिकेशनेही मोबाइल घेऊन देण्याचा आग्रह वडीलांकडे धरला होता. मात्र आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्याने मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. यामुळेच त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

 

 

दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.