Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तारानंतर आता रामदास कदमांची अनिल परबांवर आक्षेपार्ह शब्दात टीका!

0 367

 

Jawale Jewellers

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान ताजं असतानाच, आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविषयी बोलताना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली.

 

Manganga

रामदास कदम म्हणाले, “अनिल परब यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेली दापोली मंडलगड नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घातली. परब यांनी माझ्या योगेशदादावर अन्याय करून त्यांना बाजूला ठेऊन ही नगरपरिषद राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम केलं. इतकंच नाही तर अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे:, असा आरोपही रामदास कदम यांनी केला.

 

 

पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘उद्धवजींना असेच भ*** सोबत लागतात. मग ते अनिल परब असो, की विनायक राऊत असो. त्यांना अशीच दोन-चार माणसे लागतात. अशा *** जोपर्यंत उद्धव ठाकरे हे बाजूला करत नाही, तोपर्यंत त्यांच्या पक्षाचं काहीही होणार नाही’, अशा शब्दात रामदास कदम यांनी शिवीगाळ केली आहे. विशेष बाब म्हणजे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण ताजं आहे. आता रामदास कदम यांनी अनिल परब यांना शिवीगाळ केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.