मुंबई: जबलपूर येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तेरा प्रकल्पांचे भुमिपूजन मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी (4,054 कोटी) रुपयांच्या अंदाजे (214 किलाे मीटर) लांबीच्या आठ रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमिपूनज केले. त्यावेळी मंत्री गडकरी यांनी खराब रस्त्यांबाबत मध्य प्रदेश येथे जनतेची माफी मागितली आहे.
गडकरींनी खराब रस्त्याबद्दल माफी मागितली. चारशे काेटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या त्रेसष्ट किलाे मीटरचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही असे त्यांनी वक्तव्य केले.

तसेच, जुने काम दुरुस्त करुन आणि नवीन निविदा मागवत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरींनी दिले. आतापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफ करा, असे गडकरी यांनी भाष्य केले आहे.