मुंबई: वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आज मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. सकाळी 8.20 मिनिटांनी ग्रहणाचे सुतक सुरू होईल. या काळात धार्मिक किंवा शुभ कार्य केले जाणार नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
गर्भवती महिलांनी काय करावे आणि करू नये:
1.ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ परिणाम देणार आहे, त्यामुळे त्यांना ग्रहण काळात घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2.गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण काळात भाजी कापणे, कपडे शिवणे अशी कामे करू नयेत. त्यामुळे न जन्मलेल्या बाळामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
3.चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये.
4.चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा ग्रहण नये.
5.गरोदर महिलांवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी त्यांनी जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा.
6.चंद्रग्रहण संपल्यानंतर गरोदर स्त्रीने स्नान करावे.शक्य असल्यास पाण्यात गंगाजल टाकावे. यामुळे पोटातल्या बाळावर नकारत्मक परिणाम होणार नाही.
7.गर्भवती महिलांनी ग्रहण काळात प्रवास करू नये.
8.ग्रहणकाळात नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करावी.(सौ. tv9 मराठी)