नांदेड: नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कृष्ण कुमार पांडे असे मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचे नाव आहे. कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते.

याबद्दल अधिक माहिती अशी कि, राहुल गांधी यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, कृष्ण कुमार पांडे हे मूळ नागपुरचे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.