मुंबईः हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात मोठं आंदोलन केले

दरम्यान, आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून या चित्रपटावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या डोक्यातून जात अजिबात जात नाही, अशी टीका देशपांडे यांनी केली.