खुशखबर: पुन्हा राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरु: ‘या’ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात!
मुंबईः राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आता सुमारे 18 हजार 331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या – 21,764 जागा शैक्षणिक पात्रता – 12th Pass
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.