मुंबई: सोमवारी (७ नोव्हेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्षेपार्ह विधान केलं. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले असून ते आपल्या गटातील मंत्री तसेच नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचे एकदिवसीय शिबिर होणार आहे. या शिबिरात शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची कानउघडणी देखील करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
