Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 715

मेष:-
उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. आपले कौतुक केले जाईल. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील.

 

 

Jawale Jewellers

वृषभ:-
सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. तिखट पदार्थांचे सेवन करू नका. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील.

Manganga

 

मिथुन:-
कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. दिवस उत्साहात जाईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा.

 

कर्क:-
जनसंपर्कात वाढ होईल. नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल.

 

सिंह:-
दिनक्रम व्यस्त राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. आत्मविश्वासाने केलेली कामे यशकारक ठरतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल.

 

कन्या:-
मन प्रसन्न राहील. घरासाठी नवीन खरेदी कराल. आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात. स्पर्धेत यश मिळेल.

 

तूळ:-
सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

 

वृश्चिक:-
मुलांच्या कृतीने मान उंचावेल. मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

 

धनू:-
चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल.

 

मकर:-
आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. नको त्या प्रलोभनात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका.

 

कुंभ:-
नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल.

 

मीन:-
गुरुप्रती निष्ठा कायम ठेवावी. हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. न पटणार्‍या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.