Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तांरांना मुख्यमंत्र्यांनी दिले माफी मागण्याचे आदेश!

0 455

 

Jawale Jewellers

मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना फोन करून माफी मागा, असे थेट आदेशही शिंदेंनी दिल्याचे समजते.

 

 

Manganga

माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. सत्तारांच्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारांना थेट फोन करून कान टोचले आहेत. वक्तव्यावर माफी मागा असे थेट आदेशच त्यांनी दिले आहेत. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंनी तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते आणि महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर कुणीही माध्यमांशी संवाद साधण्यावर मुख्यमंत्री वटहुकूम काढणार असल्याचे समजते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.