Latest Marathi News

BREAKING NEWS

“….अन्यथा या कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना आम्ही कोळश्यासारखं जाळू”

0 488

 

Jawale Jewellers

मुंबई:महिला खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विषयी सत्तार यांनी केलेले वादग्रस्त ठरले आहे. एका महिला खासदाराविषयी बोलताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरल्याने सत्तारांच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.अशातच आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

 

Manganga

एका महिलेविषयी अश्लील भाषेत बोलत, बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारचा या खोके सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा या कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना आम्ही कोळश्यासारखं जाळू असा सणसणीत आणि टोकाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड हेमा पिंपळे यांनी दिला आहे.

 

दरम्यान आज बीड शहरातील राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी अब्दुल सत्तार हाय हाय म्हणत सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.