Latest Marathi News

BREAKING NEWS

खरसुंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषण सुरूच : उपोषणाचा तिसरा दिवस

0 750

माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी : श्री सिद्धनाथ मंदिर खरसुंडी (ता.आटपाडी) येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील बाजू संपूर्ण दिसावी यासाठी शेखर निचळ यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

Jawale Jewellers

याबाबत अधिक माहिती अशी की, शेखर सोमनाथ मिसळ यांनी दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी मंदिर मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण काढून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशद्वार संपूर्ण दिसावे यासाठी योग्य स्तरावर कारवाई करावी अन्यथा ४ दिवसात खरसुंडी ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

Manganga

ग्रामपंचायतीकडून प्रवेशद्वारासमोरील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. अद्याप अतिक्रमण हटवले नसल्याने ग्रामपंचायत समोरच शेखर निचळ यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. खरसुंडीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. व्यापारी व ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवून उपोषणास पाठिंबा दर्शविला. आटपाडी पोलीस ठाण्याचे पो.नि शरद मेमाणे, गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र अतिक्रमणाबाबत अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण खुले व्हावे, औंध संस्थानाच्या पूर्वीच्या नकाशाप्रमाणे दोन्ही दीपमाळे संपूर्ण दिसाव्यात, मुख्य पेठेतील जागा पूर्वीप्रमाणे औंध संस्थानाच्या काळात ज्या होत्या त्याप्रमाणे खुल्या करून मिळाव्यात. मुख्य प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत बांधकाम काढावे, सावलीसाठी केलेले छत पूर्णतः त्यांच्या घराच्या आत असावे, मुख्य पेठेतील सर्व मिळकती व सर्व प्रॉपर्टी कार्ड हे महाराष्ट्र शासन अखत्यारित वर्ग ‘ब’ आहे त्यामुळे त्यावर महाराष्ट्र शासनाचा कब्जा आहे. महाराष्ट्र शासन अधिनियम कलम ५२ अन्वये अतिक्रमणाबाबत थेट कारवाई करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे असे निवेदनात म्हटले आहे. खरसुंडीत तणावपूर्ण शांतता असून प्रशासन अतिक्रमणाबाबत कारवाई करणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.