Latest Marathi News

BREAKING NEWS

सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर मंत्री सत्तार यांचा घुमजाव!

0 606

 

Jawale Jewellers

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरल्यानंतर मंत्री सत्तार यांनी घुमजाव केला आहे.

 

Manganga

औरंगाबादमध्ये बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिला भगिणींबाबत अपशब्द वापरला नाही. जे लोक आम्हाला बदनाम करतायत त्यांच्याबद्दल मी बोललोय. सुप्रिया सुळेंबाबत कोणताही शब्द बोललो नाही, पण तरिही त्यांच्या महिलांची मनं दुखवली असेल तर मी खेद व्यक्त करतो, पण मी असं बोललो नाही. मी जे बोललो ते फक्त खोक्यांबाबत बोललो ज्याच्या डोक्यात परिणाम आहे. पण जे वेगळा अर्थ काढू लागले. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महिलांचा सन्मान करतायत, तसा मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे असं सत्तार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.