Latest Marathi News

BREAKING NEWS

क्रिकेटमधील स्टार फलंदाज ‘विराट कोहली’ ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित

0 113

 

Jawale Jewellers

मुंबई: जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली याला नुकत्याच मानाच्या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराटसोबत वर्ल्डपमध्ये चांगली कामिगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉमिनेट झाले होते यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश होता. पण विराटची खेळीही विराट असून प्रेक्षकांनीही त्यालाच पसंती दिल्याने विराटने पुरस्कारावर नाव कोरले आहे. तर महिलांमध्ये पाकिस्तानची निदा दार विजयी झाली आहे.

 

Manganga

दरम्यान, आयसीसीनं क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा आणि पाकिस्तानच्या निदा दार यांना नामांकित करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.