Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..म्हणून श्रीकांत शिंदेंच्या सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र”!

0 367

औरंगाबाद: औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शिंदे यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र याचवेळी श्रीकांत शिंदेंच्या सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे. ज्यात सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी नमस्कार करताना पाहायला मिळत आहे.

 

Jawale Jewellers

याबाबत बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, खरे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सभा रद्द केल्याचे मला कळाले होते. त्यांची सभा रद्द झाल्याने किमान त्यांचे व्यंगचित्र तरी आमच्या सभेत लोकांना पाहायला मिळाला पाहिजे. सत्तेत असताना कशाप्रकारे झोपले होते आणि सत्ता जाताच आता शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहे. विशेष म्हणजे पाऊस गेला, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं खाली झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.