Latest Marathi News

BREAKING NEWS

स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार!

0 280

 

Jawale Jewellers

नागपूर: कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन काहपरे (वय 26, रा. नांदा) या आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे.

 

Manganga

याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी पवन हा खापरखेडा येथील नांदा येथील रहिवासी आहे. आरोपी हा स्कूल व्हॅन चालक आहे. पीडित 15 वर्षीय विद्यार्थीनी ही शाळेत जाण्यासाठी आरोपीच्या व्हॅनमधून जात असे. या अल्पवयीन मुलीवर 12 ऑक्टोबर रोजी पवनने अत्याचार केला. आरोपीने पीडित विद्यार्थीनीला शाळेत नेण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये बसवले. मात्र, शाळेत नेण्याऐवजी कोराडी येथे फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला निर्जन स्थळी नेले. त्या दरम्यान त्याने विद्यार्थीनीवर जोरजबरदस्ती करत शारीरिक अत्याचार केले. त्याच वेळी पवनने अत्याचार करतानाचा व्हिडिओ तयार केला होता. आरोपीची पीडितेच्या नातेवाईकांसोबत ओळख होती. त्यामुळे विद्यार्थीनी आणखी घाबरली.

 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपी पवनवर पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. चौकशीदरम्यान पवन विवाहित असल्याची बाब देखील समोर आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.