Latest Marathi News

BREAKING NEWS

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CM शिंदेंची मोठी प्रतिक्रिया!

0 450

 

Jawale Jewellers

मुंबई: सुप्रीम कोर्टाने आज आर्थिक दुर्बल घटकांतील नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण कोर्टाने वैध ठरवलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

Manganga

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आज जो निर्णय दिला आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे, असे शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.