Latest Marathi News

BREAKING NEWS

“आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली, तर….”: भाजपची ऑफर असल्याचा केजरीवालांचा दावा!

0 395

गुजरात: गुजरात येथे सत्तेत असलेल्या भाजपाला यावेळी काँग्रेसोबतच आम आदमी पक्षाचेही मोठे आव्हान आहे. भाजपसाठी गुजरात हे खूप महत्वाचे आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी याच राज्यातून येतात. अशातच आता अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

 

Jawale Jewellers

अरविंद केरीवाल यांनी भाजपवर आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्षाने आधी मनीष सिसोदिया यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, आता ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाला सोडून दिल्लेचे मुख्यमंत्री बनण्याचा भाजपचा प्रस्ताव मनीष सिसोदिया यांनी नाकारला होता. ते म्हणाले, ”गुजरात सोडून निवडणूक न लढवल्यास ते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध सुरु असलेला केंद्रीय यंत्रणांचा तपास बंद करतील. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप हटवले जातील.” ही ऑफर तुम्हाला कोणी दिली असं त्यांना विचारलं असता, केजरीवाल म्हणाले की, ”मी माझ्या कोणाचे नाव कसं घेऊ शकतो, हा प्रस्ताव त्यांच्याकडून आला होता. ते कधी सरळ संपर्क करत नाही. ते एकाकडून दुसऱ्या मित्राकडे जातात आणि त्यांच्या माध्यमातून संदेश पाठवतात.”

Manganga

 

दरम्यान, आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली, तर भाजप केंद्रीय यंत्रणांच्या तपासात अडकलेले मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना सोडेल, अशी भाजपने त्यांना ऑफर दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.