Latest Marathi News

BREAKING NEWS

“अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत EVM मशीन हॅक झाला”!

0 416

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक झाला असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केला आहे.

 

Jawale Jewellers

मिलिंद कांबळे म्हणाले, “निवडणुकीत मला 12 हजार मतदान पडेल, अशी शाश्वती होती. मात्र, मला 614 मते पडली. त्यामुळे माझे मतदान ईव्हीएमधून ट्रान्सफर झाले असल्याचा मला संशय आहे, असे मिलिंद कांबळे यांनी म्हटलं आहे.

Manganga

 

तसेच, निवडणुकीत उभ्या असलेले इतर तीन उमेदवार बाळा नाडार (1515 मतं), नीना खेडेकर (1531 मतं) राजेश त्रिपाठी (1571 मतं) या तिघांनाही अनुक्रमे 1500 च्या घरातच मतदान झाल्याने ईव्हीएम मशीन फेरफार झाला असण्याची दाट शक्यता आहे, असा आरोपही कांबळे यांनी केला आहे.

 

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीला मी मुंबई उच्च न्यायालयात चॅलेंज करणार असल्याचेही मिलिंद कांबळे यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.