Latest Marathi News

BREAKING NEWS

नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेले EWS आरक्षण वैध: सुप्रीम कोर्ट!

0 294

मुंबई: आर्थिक दुर्बल घटकांना सुप्रीम कोर्टाने आज मोठा दिलासा दिला आहे. नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेले १० टक्के EWS आरक्षण कोर्टाने वैध ठरवले आहे.

 

Jawale Jewellers

सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे EWS आरक्षण कायम असणार असून त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Manganga

 

दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने आर्थिक दुर्बल घटकांचे १० टक्के आरक्षण कायम राखण्याचा निकाल दिला आहे. निकाल देताना १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.