Latest Marathi News

BREAKING NEWS

राज-उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा आज शिंदे गटात प्रवेश!

0 593

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना आज खूप मोठा धक्का दिलाआहे. कारण शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला . यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

 

 

Jawale Jewellers

“काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. त्यांना पोटशूळ उठलेलं आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढं काम करतंय, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहीलं तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झालीय”, असा खोचक दावा शिंदेंनी केला.

Manganga

 

दरम्यान, हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील आहेत. हे सर्व कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.