Latest Marathi News

BREAKING NEWS

“ऋतुजा लटकेंचा विजय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे….”!

0 350

अमरावती : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ऋतुजा लटके यांच्या विजयाबद्दल अभिनंदन देखील केले.

 

Jawale Jewellers

भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, “अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. या विजयाचे श्रेय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यायला पाहिजे.
तसेच, आज जे शिवसैनिक नाचून पेठे वाटून राहिले आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. कारण त्यांनी भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. म्हणून ऋतुजा लटके यांचा विजय झाला. तर भाजपचा उमेदवारी अर्ज कायम असता तर आज ते नाचत आहे; त्या शिवसैनिकांचे चेहरे लटकलेले राहिले असते, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.