Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मी हे गुजरात बनवले आहे’: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीचा नवा नारा!

0 305

 

Jawale Jewellers

नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापरडा येथे उपस्थितांना संबोधित केले.

 

Manganga

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘माझ्यासाठी आपल्याला भूपेंद्र यांना जिंकवावे लागेल. मला विक्रम तोडण्यासाठी मदत करा’. यावेळी मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा नारा दिला. मोदी पुढे म्हणाले, ‘मला सर्व विक्रम तोडायचे आहे. भूपेंद्र यांचे विक्रम हे माझ्यापेक्षा चांगले पाहिजे. मी त्याच्यासाठी काम करू इच्छित आहे’.

 

तसेच, ‘एकेकाळी आपण डॉक्टरांची शोधाशोध करायचो. आता आदिवासी भागात रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहेत. गुजरात घडवण्यासाठी प्रत्येक गुजरातींनी मेहनत घेतली. प्रत्येक गुजराती लोकांना प्रचंड आत्मविश्वास असतो. प्रत्येक गुजरातींच्या हृदयातून एक आवाज निघतो, मी हे गुजरात बनवले आहे’, असेही मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.