Latest Marathi News

BREAKING NEWS

“….तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच गेली असती”: ‘या’ शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य !

0 166

जळगाव :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार शिर्डी येथील अधिवेशनानंतर कोसळेल, असे भाकीत केले आहे. यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया दिली.

 

Jawale Jewellers

गुलाबराव पाटील म्हणाले, “भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने पहाटे कोंबडा आरविण्यापूर्वीच सत्तेत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबतच गेली असती, असे विधान राज्याचे पाणीपुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.