Latest Marathi News

BREAKING NEWS

ऋतुजा लटके यांची विजयानंतर मोठी प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपने निवडणुकीआधीच…..”!

0 348

 

Jawale Jewellers

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना ऋतुजा लटके यांनी म्हटलं की, हा विजय माझे दिवगंत पती रमेश लटके यांचा आहे. शिवसैनिकाच्या मेहनतीने हा विजय शक्य झालाय. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार ऋतुजा लटकेना यांनी मानले.

 

Manganga

माझे पती रमेश लटके यांनी केलेल्या कामांच्या पुण्याईवर मतदारांनी मतदान केले. यापुढे त्यांनी आपल्या परिसराच्या विकासासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यांनी ठरवलेली पण अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं.

 

 

भाजपने निवडणुकीआधीच सर्व्हे केला होता. त्यामुळे त्यांना किती मतं पडतील याचा अंदाज त्यांना होता. आता नोटाली जी मतं पडली आहेत ती भाजपची मतं आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक लढली असती तर त्यांना १० हजारांच्या आसपास मतं मिळाली आहे. पराभव दिसत असल्यामुळे भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.