Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी बाजार समिती येथेच शेळ्या-मेंढ्याची कार्तिक यात्रा व आठवडी बाजार भरवावा : प्रभाकर पुजारी

वारवार बाजाराचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा परिणाम येथील शेतकरी, शेळ्या-मेंढ्या व्यापारी यांच्यावर होणार

0 1,135

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी बाजार समितीचे प्रशासक यांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता शेळ्या-मेंढ्याचा आठवडी बाजार हा बाजार समितीच्या आवारातच भरविण्यात यावा. अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांनी केली आहे.

Jawale Jewellers

आटपाडी येथे सालाबादप्रमाणे कार्तिकी पोर्णिमे निमित्त भरणारी शेळ्यामेढ्यांची यात्रा कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड येथे सोमवार दिनांक ७/११/२०२२ ते बुधवार दि. ०९/११/२०२२ अखेर भरणार आहे. तसेच शेळ्यामेंढ्या चा नियमित भरणारा आठवडा बाजार मार्केट यार्ड येथेच भरणार असल्याचे असे बाजार समितीचे प्रशासक वैभव हजारे यांनी जाहीर केले होते.

Manganga

बाजार समिती आवारात बाजार भरविण्यास आटपाडी बाजार पटांगण येथील व्यापारी यांनी विरोध केला असला तरी बाजार समिती आवारात ही व्यापारी आहेत. तसेच आज पर्यंत शेळ्या-मेंढ्याचा बाजार हा आटपाडी बाजार पटांगण येथेच भरत होता. या ठिकाणी तेथील स्थानिक व्यापारी व बाजार समितीने शेतकरी व व्यापाऱ्यांची तसेच शेळ्या-मेंढ्याची चारा, पाणी याची कोणतीही सोय केली नसल्याचे प्रभाकर पुजारी म्हणाले.

तसेच वारवार बाजाराचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा परिणाम येथील शेतकरी, शेळ्या-मेंढ्या व्यापारी यांच्यावर होणार असून यामुळे बाजार मोडकळीस येणास वेळ लागणार नाही. त्यामुळे बाजार समितीचे प्रशासक यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता बाजार हा आटपाडी बाजार समिती आवारातच भरवावा अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.