Latest Marathi News

BREAKING NEWS

“….तेवढीच मते भाजपाने माघार घेतली नसती तर भाजपाला पडली असती”: भाजपच्या दाव्याला काँग्रेसचं प्रत्युत्तर!

0 279

मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या. ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मते मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांनी विजय मिळवताच, प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांनी अंधेरीसह मुंबईतील ठिकठिकाणी फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष केला आहे.

 

Jawale Jewellers

यानंतर, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके या प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन! हा विजय येत्या सर्व निवडणुकींमध्ये भाजपाच्या पिछेहाटीची नांदी आहे. जेवढी मते “नोटा” ला मिळाली तेवढीच मते भाजपाने माघार घेतली नसती तर भाजपाला पडली असती. या पोटनिवडणुकीत ३१.७४% मतदान झाले. गतवेळी ५३.८२% मतदान होते. तरीही ऋतुजा लटके यांना रमेश लटके यांच्यापेक्षा अधिक मतदान झाले आहे.

Manganga

 

“गिरे तो भी टांग उपर” करण्याचा सराव येत्या काळात कामी येईल यात शंका नाही. पण भाजपाने आपल्या कार्यालयात गणिताचा वर्ग सुरु केला तर कारण पटणारे देता येईल, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.